जळगाव मिरर | २४ नोव्हेंबर २०२६
जेठाणी सोबत पतीच्या अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या मनीषा चेतन राठोड हिचा खून केल्याप्रकरणी पती चेतन दलेरसिंग राठोड याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. मोरवाले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दि. २३ नोव्हेंबर रोजी हा निकाल दिला असून मयताच्या मुलाला तीन महिन्यांच्या आत दोन लाख रुपये भरपाई देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील गाळण शिवारातील शेतामध्ये राहणारा चेतन राठोड याचे मयत विवाहितेच्या जेठाणी सोबत अनैतिक संबंध असल्याचे माहित पडले होते. दरम्यान, चेतन राठोडला त्याची पत्नी मनीषा त्यास विरोध करत होती. तसेच सासरच्या मंडळीकडून तिचा छळ केला जात होता. दि. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात कामकाज चालले. त्यात सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. सर्व साक्षी, पुराव्यांआधारे न्या. एस. एन. मोरवाले यांनी चेतन राठोड यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. भारती खडसे यांनी प्रभावी युक्तीवाद केला.
ज्या दिवशी मनीषाचा मृत्यू झाला, त्या वेळी घरात ती व पती असे दोघेच घरात होते. त्या वेळी चेतनने एका हाताने छाती व दुसऱ्या हाताने नाका-तोंडावर हात ठेवून तिचा श्वास रोखून ठेवत अत्यंत क्रूरपणे खून केला. हा प्रकार वैद्यकीय अहवालातून पुढे आले असून ते न्यायालयासमोर मांडले. या खटल्याचे कामकाज न्यायालयासमोर सुरु असतांना यातील पंच फितूर झाले. मात्र असे असतानाही सरकार पक्षातर्फे सरकारी वकील भारती खडसे यांनी सलग तीन दिवस प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी विविध न्यायनिवाड्यांचे दाखले देण्यासह भारतीय पुरावा कायदा कसा लागू होतो, हे निदर्शानास आणून देत गुन्हा सिद्ध केला. विविध न्यायनिवड्यांचे दाखल्यांसह प्रभावी युक्तीवादाचे निरीक्षण नोंदविल्यानंतर न्यायालयाने चेतन राठोड याला दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताच मयताच्या भावाला अश्रू अनावर झाले होते. पैरवी अधिकारी राजेश भावसार व केस वॉच सुनील निकम यांनी सहकार्य केले. हे ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र, तक्रारीचा सातत्याने पाठपुरावा करून संबंधित प्रकरणात चौकशी पूर्ण होऊन सेवानिवृत्तीपूर्वीच निलंबनाची कारवाई झाल्याने जि.पत खळबळ उडाली आहे.
या खटल्यात खुनाचे कारण अत्यंत क्लिष्ट व दुर्मिळ होते. महिलेच्या शरीरावर हिंसाचाराच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव सोनार यांनी लक्षणे अहवालात नोंदवली. महिलेचा मृत्यू ‘बर्किंग’ अर्थात गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले. गेल्या ४० वर्षांच्या इतिहासात अशा प्रकारे खून होण्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात आले.





















