• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 9, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ ऑक्टोबर २०२६

रावेर तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध चारचाकी वाहनातून बळजबरीने घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी दि. ८ रोजी पहाटे पिंपरुड-सावदा रस्त्यावर घडल्याचा आरोप आहे. यावेळी तरुणीच्या आई-वडिलांना मारहाण करण्यात आल्याची तक्रारही सावदा पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी टेकचंद रविंद्र सरोदे (रा. रोझोदा, ता. रावेर) याच्यासह तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, संबंधित तरुणीचे यापूर्वी टेकचंद सरोदे याच्यासोबत लग्न झाले होते. मात्र, त्यानंतर ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. या प्रकरणासंदर्भात न्यायालयीन वाद सुरू असून, गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी होती. त्यासाठी तरुणी तिच्या आई-वडिलांसोबत मोटारसायकलवरून भुसावळकडे जात होती. पहाटे सुमारे ५.१५ वाजता पिंपरुड-सावदा रस्त्यावर स्मशानभूमीपासून काही अंतरावर वळणाजवळ त्यांच्या मोटारसायकलला मागून ग्रे रंगाच्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. धडकेनंतर वाहनातून तीन जण खाली उतरले. त्यापैकी दोघांनी चेहऱ्यावर काळे मास्क लावले होते, तर टेकचंद सरोदे याचा चेहरा उघडा असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. यानंतर तिघांनी स्प्रेच्या सहाय्याने तरुणी आणि तिच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर फवारणी केल्याने त्यांना जळजळ होऊ लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यावर तिला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

मुलीला वाचविण्यासाठी तिच्या आईने हस्तक्षेप केला असता तिच्याशीही चापट बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या झटापटीदरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तुटून पडल्याचेही फिर्यादीने सांगितले आहे. दरम्यान, दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला पकडून ठेवत मारहाण केली, तर टेकचंद सरोदे याने तरुणीला बळजबरीने वाहनात बसविल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तिघेही कारमध्ये बसून पिंपरुडच्या दिशेने भरधाव निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर फिर्यादी आणि त्यांची पत्नी सावदा पोलीस ठाण्यात दाखल झाले. दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी सावदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून बेपत्ता तरुणीचा शोध घेण्यात येत असून, घटनेत वापरण्यात आलेले चारचाकी वाहन तसेच अन्य संशयितांचा शोध घेतला जात आहे. तक्रारदाराने वाहन आणि चेहरा झाकलेल्या संशयितांना समोर आणल्यास त्यांची ओळख पटवू शकत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group