• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ट्रॅक्टरवरील ताबा सुटला अन् थेट कालव्यात कोसळला; युवकाचा दुर्देवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 21, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ट्रॅक्टरवरील ताबा सुटला अन् थेट कालव्यात कोसळला; युवकाचा दुर्देवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ नोव्हेंबर २०२६

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथून जवळच असलेल्या आडगाव येथे शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घेऊन जाताना चालकाचा अचानक ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट जामदा डाव्या कालव्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आडगाव परिसरात घडली.

एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील विजय भाऊसाहेब पाटील (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण आडगाव परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, आडगाव येथील भाऊसाहेब बापुराव पाटील यांच्या मालकीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर त्यांचा मोठा मुलगा विजय चालवत होता. गुरुवारी सकाळी भूषण चौधरी यांच्या शेतात रोटाव्हेटरच्या साहाय्याने मशागतीचे काम करण्यासाठी विजय ट्रॅक्टर घेऊन निघाला. तर, पारोळा फाट्याजवळील जामदा डाव्या कालव्याच्या पाटचारीवरून जात असताना अचानक ट्रॅक्टरवरील त्याचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रॅक्टर थेट कालव्यात जाऊन कोसळले. या भीषण अपघातात विजय ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच ईश्वर दयाराम पाटील यांनी विजयचे काका धनराज डिंगबर पाटील यांना ही माहिती दिली. धनराज पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी पोलीस पाटील तसेच नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टरखाली अडकलेल्या विजयला बाहेर काढण्यात आले.

अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. तर, गंभीर जखमी विजयला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मयत घोषित केले. तर, विजयचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत विजयचे काका धनराज डिंगबर पाटील यांनी कासोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन घटनेची नोंद करण्यात आली आहे.

विजय हा भाऊसाहेब पाटील यांचा मोठा मुलगा होता. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. घरातील मोठा मुलगा आणि कुटुंबाचा आधार असलेल्या विजयच्या अकाली निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे आडगाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Related Posts

वर्षभरापासून जीवघेणा खड्डा : २० अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष; नारळाचा ट्रक उलटला! !
क्राईम

वर्षभरापासून जीवघेणा खड्डा : २० अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष; नारळाचा ट्रक उलटला! !

November 21, 2026
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत ५० कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी आणि वितरण
जळगाव ग्रामीण

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत ५० कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी आणि वितरण

November 20, 2026
गावठी दारूचा धंदा उघड; फत्तेपूर पोलिसांची कारवाई, ४ जणांविरुद्ध गुन्हे

मन्यारखेडा नंदनवन प्रकल्पात ३,१३१ वृक्षांचे रोपण; संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा : वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

जळगावात दुचाकी चोरीचा पर्दाफाश; दोघांच्या मुसक्या आवळल्या, ५ दुचाकी जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
वर्षभरापासून जीवघेणा खड्डा : २० अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष; नारळाचा ट्रक उलटला! !

वर्षभरापासून जीवघेणा खड्डा : २० अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष; नारळाचा ट्रक उलटला! !

November 21, 2026
ट्रॅक्टरवरील ताबा सुटला अन् थेट कालव्यात कोसळला; युवकाचा दुर्देवी मृत्यू !

ट्रॅक्टरवरील ताबा सुटला अन् थेट कालव्यात कोसळला; युवकाचा दुर्देवी मृत्यू !

November 21, 2026
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत ५० कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी आणि वितरण

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत ५० कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी आणि वितरण

November 20, 2026
गावठी दारूचा धंदा उघड; फत्तेपूर पोलिसांची कारवाई, ४ जणांविरुद्ध गुन्हे

गावठी दारूचा धंदा उघड; फत्तेपूर पोलिसांची कारवाई, ४ जणांविरुद्ध गुन्हे

November 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group