जळगाव मिरर | २४ नोव्हेंबर २०२६
चाळीसगाव शहरातील चौधरीवाडी परिसरात एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ नोव्हेंबरला रात्री उघडकीस आली. अरबाज खान आसिफ खान (रा. संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. व्याजाने घेतलेल्या २० हजार रुपयांच्या बदल्यात ४० हजार रुपयांची मागणी करून धमक्या दिल्यामुळेच मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.

याप्रकरणी ललित अशोक चौधरी (रा. घाटरोड, चाळीसगाव) याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अरबाज हा ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. २० नोव्हेंबरला तो दुचाकीने चाळीसगाव येथे वडिलांना भेटण्यासाठी आला होता.




















