
जळगाव मिरर / १६ ऑक्टोबर २०२२
ज्या मुलांना, महिलांना त्यांच्या कुटुंबांना दिवाळी म्हणजे काय असते याचा कसलाही गंध नसतो फराळ कधी बघितलेला नाही, खाल्ला नाही अशी चिमुकली बालके , महिला ज्या मजुरी करतात, जेमतेम पोटा पाण्यासाठी दिवाळी सारख्या सणात देखील साधी भाजी भाकरी खायला नसते अशी परिस्थिती असलेल्या अशा कुटुंबांना नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगावच्या वतीने फराळ, मिठाई साडी व लहान बालकांना कपडे वाटप करण्यात आले.
चोपडा तालुक्यातील आदिवासी पाडा पानशेवडी व अर्जुन पाडा येथे जवळ जवळ १५० कुटुंबांना दिवाळी फराळ व कपडे वाटप करण्यात आले.यावेळी अध्यक्ष सौ मनिषा पाटील, सचिव ज्योती राणे, नूतन तासखेडकर, किमया पाटील, संगीता चौधरी , नेहा जगताप रेणुका हींगु आशा मौर्य, शशी शर्मा, माधुरी शिंपी, योगिता बाविस्कर, छाया पाटील, भारती कापडणे यांच्या हस्ते दिवाळी फराळ मिठाई व कपडे वाटप करण्यात आले. यासाठी महापौर जयश्री ताई,उर्मिला सोनी, भारती सोनी,पूर्णिमा देसाई ,उज्वला पाटील पाचोरा ,वर्षा पाटील, सीमा जाधव ,डॉ प्राची महाजन व नारीशक्तीच्या प्रतिनिधींचे आर्थिक सहकार्य लाभले तसेच प्रेमराज पवार यांचेही सहकार्य लाभले.




















