जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२४
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी आमीष दखवून फूस लावून पळवून नेले. ही घटना दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता पिडीत मुलगी ही आपल्या घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमीष दाखवत फूस लावून पळवून नेले. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर हे करीत आहे.