जळगाव मिरर | २४ सप्टेंबर २०२४
आई-वडील कामावर गेलेले असताना घरी एकटीच असलेल्या चंदा महेश राठोड (वय १९, रा. समर्थ कॉलनी) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिची लहान बहीण घरी आल्यानंतर ही घटना उघडीस आली. काही महिन्यांपूर्वीच ही तरुणीनी नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समर्थ कॉलनीत महेश राठोड हे पत्नी, मुलगा व तीन मुलींसह वास्तव्यास आहे. त्यातील मोठी मुलगी चंदा ही काही महिन्यांपूर्वी नीट परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर ती खंडवा येथे नातेवाईकांकडे गेलेली होती. महिनाभरापूर्वीच ती जळगावात आली होती. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तिचे आई वडील कामावर गेलेले असल्यामुळे चंदा ही घरी एकटीच होती. घरी कोणी नसताना दुपारी चंदाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
दुपारी चंदाची सर्वात लहान बहीण शाळेतून घरी आली त्या वेळी तिला मोठ्या बहीणीने गळफास घेतल्याचे दिसले. तिने शेजाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय घरी आल्यावर चंदाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. गेल्या महिनाभरापुर्वी नीट परिक्षेचा निकाल लागला चंदा ती परिक्षा पास झाली होती. अभ्यासात हुशार असलेल्या चंदाने आत्महत्येसारखे टोकाचा निर्णय घेतल्याचा तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.