जळगाव मिरर / २३ फेब्रुवारी २०२३ ।
जगभरात अनेक विचित्र नात्यांबद्दल ऐकायला मिळतं, ज्याबद्दल जाणून आश्चर्य वाटेल. कधी एखादी स्त्री सावत्र मुलाशी लग्न करते तर कधी आजोबा-नात एकमेकांचा हात धरतात. सत्य माहीत असूनही अशा लोकांना वेगळं व्हायचं नसतं. पण आज आम्ही तुम्हाला जी घटना सांगणार आहोत ती थोडी वेगळी आणि रोमांचक आहे. यात, ज्या मुलाला आईने जन्म दिला, सांभाळ केला आणि वाढवलं, त्याने नोव्हेंबर 2022 मध्ये आपल्याच मुलाच्या बाळाला जन्म दिला. आता तिला फक्त आजीच नाही तर आपल्याच मुलाच्या बाळाची आई देखील म्हटलं जातं. प्रकरण अमेरिकेतील आहे. तिथे राहणारी नॅन्सी हॉक नावाची महिला आपल्याच मुलाचं मूल पोटात वाढवत होती. नोव्हेंबर 2022 मध्ये महिलेनं तिच्या नातवाला जन्म दिला. पण आई आणि मुलामध्ये काहीही चुकीचं नव्हतं.
मग आता हे कसं घडू शकतं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर मग आम्ही तुम्हाला याविषयी सविस्तर सांगू. वास्तविक, नॅन्सीची सून कॅम्ब्रिया हिने 2021 मध्ये दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. यादरम्यान, तिने हिस्टरेक्टॉमी केली होती, म्हणजे गर्भधारणेनंतर लगेचच वैद्यकीय समस्येमुळे तिचे गर्भाशय काढून टाकण्यात आले होते. त्या काळात कॅम्ब्रियाच्या जीवाला धोका होता तरीही तिने पर्वा केली नाही आणि 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. तिला आधीच 2 मुले होती. या जोडप्याला आणखी एका मुलाबद्दल प्लान करायचा होता, परंतु वैद्यकीय समस्यांमुळे ते शक्य झालं नाही. अशा स्थितीत 56 वर्षीय नॅन्सीने आपल्या 33 वर्षीय मुलाशी बोलून सरोगसीद्वारे त्याच्या पाचव्या मुलाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली.
पण प्रश्न असा होता की वयाच्या ५६ व्या वर्षी सरोगसी शक्य आहे का? अशा परिस्थितीत नॅन्सीचा 32 वर्षांचा मुलगा जेफ आणि 30 वर्षांची सून कॅम्ब्रिया यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आणि नॅन्सी सरोगसीसाठी योग्य असल्याचं आढळून आलं. अशाप्रकारे नोव्हेंबरमध्ये नॅन्सीने आपल्या मुलाच्या मुलीला जन्म दिला आणि ती त्याची आजी आणि आई बनली.
याबाबत डॉ.रसेल फोक म्हणाले की, नॅन्सीकडे पाहता वय हा फक्त एक आकडा आहे असे म्हणता येईल. एकीकडे या वयात जिथे अनेक आजार लोकांना घेरतात तिथे नॅन्सी एकदम फिट होती. अशा परिस्थितीत, जेव्हा आम्ही तिच्या शरीरात भ्रूण हस्तांतरित केलं, तेव्हा अवघ्या 6 दिवसांनी गर्भधारणेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. नॅन्सी यांचे पती जेसन सांगतात की, नॅन्सी 56 वर्षांची होती. अशा परिस्थितीत, मूल पूर्णपणे सुरक्षित असेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती, परंतु हे सर्व शक्य झालं. कालांतराने, बाळाबद्दलची आमची चिंता कमी झाली कारण ते चांगलं विकसित होत होतं. त्याचवेळी नॅन्सी म्हणाली की, मला अनेकदा वाटलं की मी हे मूल गमावू शकते, परंतु सर्व काही ठीक झालं. तिच्या सासूबाईंच्या बाळाला पाहून कंब्रियाला खूप आनंद होतो. कुटुंबाचा असा विश्वास आहे की हा अनुभव आधीच्या गर्भधारणेपेक्षा खूप वेगळा होता.