अमळनेर : विक्की उत्तम जाधव
नगरपालिकेने अमळनेर शहरात विविध ठिकाणी पालिकेने लावलेली झाडे लावली आहेत. यातील काही झाडांची कत्तल करून लाकडाची चोरी झाली. ही जिवंत झाडे तोडल्या प्रकरणी शहरात तिघां लाकूडतोड्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर नगरपरिषदेतील अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी अमळनेर पोलिसात ही फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अमजदखान उस्मान खान मेवाती, मोहसीन खान शफी आणि भुऱ्या खान अख्तर खान मेवाती या तिघांविरुद्ध भादवी कलम 379,34 व 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपींनी कोणतीही परवानगी नसताना 8 हजार रुपये किमतीचे पिंपळाचे झाड, 9 हजार रु किमतीचे निंबाचे झाड व 8 हजार रुपये किमतीचे वडाचे झाड असा एकूण 25 हजार रुपये किमतीची झाडे तोडून चोरून नेले आहे. यातील पिंपळाचे झाड पवन टी स्टॉल च्या मागून, निंबाचे झाड बाजार समिती मागील सुरभी कॉलनीतुन तर पैलाड भागातील दादाजी हॉटेल जवळून वडाचे झाड इ, झाडे आहेत पुढील तपास पो हे कॉ.प्रमोद पाटील करीत आहेत.





















