
जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२४
शहरातील शिवाजीनगर भागातील लाकुडपेठ परिसरातील ओम मार्बल या कारखान्याला शुक्रवारी दि. ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सक्रीटमुळे आग लागली. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या बंबांनी अर्ध्या तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीमध्ये हजारोंचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लाकुड पेठ भागातील ओम मार्बल हा शांतीलाल पटेल यांच्या मालकीचा मार्बलचा कारखाना आहे. या कारखान्याच्या वर असलेल्या पर्त्याच्या शेडला अचानक आग लागली. कारखान्यातील काम करणाऱ्या कामगारांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकाला माहिती देण्यात आली. काही वेळात अग्निशमन विभागाचे पथक आल्यानंतर दोन बंबाव्दारे ही आग आटोक्यात आली.
कारखान्याचे मालक शांतीलाल पटेल यांनी पर्त्याच्या शेडमध्ये मार्बल असल्यामुळे फारसे नुकसान झाले नसल्याचे सांगितले. मात्र, या कारखान्याच्या शेजारीच काही सॉ मील आहेत. जर आग आटोक्यात आली नसती तर मोठी हानी झाली असती. सुदैवाने केवळ अर्ध्या तासातच ही आग आटोक्यात आली आहे. मनपाच्या अग्निशामक दलाने लागलीच या आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.



















