जळगाव मिरर | १२ सप्टेबर २०२४
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच पुणे येथून एका भीषण अपघाताची माहितीसमोर आली आहे. पुणे-दिघीबंदर महामार्गावर भुकूम हद्दीतील हाँटेल गारवा समोर भरधाव वेगात असलेल्या डंपर खाली सापडून पती पत्नीचा जागेवरच दुर्देवी अंत झाला आहे. ही घटना दि.११ रोजी मध्यराञी एक वाजता घडली आहे. अनिल काळु सुर्यवंशी आणि त्यांची पत्नी प्रिया ( रा.लवळे फाटा, पिरंगुट ता. मुळशी ) याचा या अपघातात जागेवरच दुर्देवी अंत झाला आहे. अपघात झाल्यानंतर डंपर चालक फरार झाला आहे. या प्रकरणी अभिजित दत्तात्रय तरवडे (रा. पिरंगुट, ता.मुळशी, मुळ रा बारागांव नांदुर ता राहुरी ) यांनी पौड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया सुर्यवंशी या मंगळवारी दि.११ मैञिणीबरोबर पुण्यात गणपती बघायला गेल्या होत्या. त्या राञी भुगांव येथे आल्या. त्यांना घेण्यासाठी त्यांचे पती अनिल हे लवळे फाटा येथून भुगावला आले होते. प्रिया यांना अनिल यांनी दुचाकीवर ( एमएच १२ टिएक्स ०३९५ ) घेऊन लवळे फाट्याकडे जात असताना मध्यराञी एक वाजता भुकूमकडून भुगावकडे निघालेल्या डंपरने ( नंबर एमएच १४ एलजी ७९११ ) हॉटेल गारवा समोर जोरदार धडक दिली. यामध्ये अनिल आणि प्रिया यांच्या डोक्यातून रक्ताचे रस्त्यावरून अक्षरशः पाट वाहत होते. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर डंपर चालकाने तेथून पळ काढला. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पौड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते.
अनिल आणि प्रिया यांचा आठ महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. अनिल हे उरवडे रोडवरील एका कंपनीत तर प्रिया या भुगावला एका शाँपमध्ये कामाला होते. दोघांच्या मनमिळावू स्वभावामुळे झालेल्या आपघातामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण हे करीत आहेत.