जळगाव मिरर | ९ ऑक्टोबर २०२३
शहरातील एकाच भागात राहणाऱ्या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर मेहरून तलाव परिसरात बलात्कार करून तिचा वेळोवेळी पाठलाग करून तिच्याशी अंगलटपणा करून तिला त्रास देणाऱ्या तरुणांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात दानिश तडवी तरुणीला गेल्या तीन चार वर्षांपासून ओळखत असून ती इयत्ता अकरावीत असताना त्याने 2021 मध्ये कांताई धरण परिसरात विनयभंग केला होता तसेच तरुणी बारावीत गेली असता तिच्यावर 2022 साली मेहरुन तलाव परिसरात असणाऱ्या झाडाझुडपांच्या मध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर विद्यार्थिनीने दुसऱ्या एका महाविद्यालयात प्रवेश घेऊन तिथे शिकायला लागली.मात्र आरोपी दानिश तडवी हा तिचा पाठलाग करून तिला त्रास देऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता.
या त्याच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून तिने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला धाव घेऊन दानिश तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवून दानिश तडवी याला ताब्यात घेतले. या घटनेचा तपास उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ पठाण, योगेश बारी, मुकेश पाटील, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे आदींचा पथकाने केली. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच आरोपीचा शोध घेण्यात आला होता व त्याला शनिवारी रात्री अटक केली होती .त्याला आज रोजी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे.