जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२३
जळगाव शहरातील भररस्त्यावर १५ जिवंत काडतुसे व बनावट गावठी दोन पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे. असून या संशयित आरोपीचे नाव नमीर खान आसिफ खान (वय-१९) असे आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील काट्याफाईल परिसरात संशयित आरोपी नमीर खान आसिफ खान हा सोबत २ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत कडतुस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता काट्याफाईल परिसरात कारवाई करत संशयित आरोपी नामीर खान याला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळून गावठी बनावटीचे २ पिस्तूल आणि १५ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहे.