जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२४
जळगाव शहरात गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने कोयता व चॉफर घेऊन दुचाकीवरुन जाणाऱ्या तीन जणांवर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत घातक हत्यारे जप्त केली. ही कारवाई रविवारी रात्री शनिपेठ पोलिस चौकीसमोर करण्यात आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्रे घेऊन दुचाकीवरून जाणाऱ्या विशाल अशोक पाटील (वय २८, रा. चौगुले प्लॉट), निर्मल नंदू अहिरे (वय २३, रा. मेस्कोमाता नगर), सतीश शालिक सैंदाणे (वय २९, रा. वाल्मीक नगर) या तिघांना शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कायेता, चॉपर अशी घात हत्यारे जप्त केली. याप्रकरणी पोकों राहुल पाटील यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.