अमळनेर : विक्की उत्तम जाधव
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा दहन केला.
सर्व भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व व सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी तिरंगा चौकात एकत्र येऊन तेथून पाचपावली देवी, बसस्थानकामार्गे महाराणा प्रताप चौकापर्यंत आव्हाड यांच्या पुतळ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी आव्हाड यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड पुतळा दहन करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी भाजपचे पंकज भोई, चंद्रकांत कंखरे, मनोज शिंगाणे, सौरभ पाटील, रोहन कासार, हर्षल ठाकूर, सचिन माळी, राहुल बडगुजर, सोनू बोरसे, शिवकिरण बोरसे, हितेश शहा, मंगेश चव्हाण, विश्व हिंदू परिषद अमळनेरचे अध्यक्ष डॉ. संजय शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजय पाटील, बजरंग दलचे मनोज मराठे, धर्मजागरण प्रमुख मुकेश परदेशी, शिव किरण बोरसे उपस्थित होते.