जळगाव मिरर | २४ नोव्हेंबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून राज्यात महायुतीला एकहाती सत्ता मिळाली आहे. तर महाविकास आघाडीला यंदा मात्र मोठा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील महायुतीला मोठे यश मिळाले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जिल्ह्यातील दोन ठिकाणी सभा घेतल्या अन बाजी पलटवून ‘त्या’ दोन उमेदवार निवडून आले आहे.
जळगाव जिल्हयातील राजकीय वातावरण तापले असताना विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी महायुतीवर विविध मुद्याच्या माध्यामातून हल्लाबोल करण्याची एक देखील संधी सोडत नव्हती. तर दुसरीकडे महायुती मात्र विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रचार करीत होती. जिल्ह्यातील चाळीसगाव व रावेर मतदार संघात भाजपचे उमेदवार मैदानात होते. रावेर मतदार संघात माजी आमदार पुत्र अमोल जावळे तर चाळीसगाव मतदार संघात आ.मंगेश चव्हाण हे मैदानात होते. या दोन उमेदवारांसाठी अमित शहा यांनी सभा घेऊन या मतदार संघातील निकाल बदलवून टाकला आहे. चाळीसगाव मतदार संघात दोन मित्रांमध्ये यंदाची विधानसभा निवडणूक गाजली होती. यात आ.मंगेश चव्हाण यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या मुद्यावर आ.चव्हाण मते मागत होती तर महाविकास आघाडीचे उमेदवार भाजपमधून बाहेर पडलेले माजी खा.उन्मेष पाटील हे देखील मते मागत होती. मात्र चाळीसगावकर जनतेने आ.मंगेश चव्हाण याना पुन्हा एकदा संधी दिली आहे.
रावेर मतदार संघात माजी आ.हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना पहिल्यांदाच पक्षाने विधानसभा निवडणुकीत उतरविले होते. हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो मात्र यंदा काँग्रेसने माजी आ.शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी देऊन मोठी चूक केली व हीच संधी भाजपने साधत या ठिकाणी तरुण उमेदवार दिला व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली व या मतदार संघाचे गणित पालटले व अमोल जावळे यांची विधानसभेत प्रवेश झाला.