जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२४
सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर ती गर्भवती राहिली. नंतर मुल नको म्हणून तिचा गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुणे येथे डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे उघडकीला आली. ही घटना झिरो नंबर ने वरणगाव पोलिसात वर्ग करण्यात आल्याने याप्रकरणी पतीसह माहेर व सासरकडच्या मंडळींविरोधात वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील २८ वर्षीय तरुणाचे लग्न अकोला जिल्ह्यातील कपाशी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुली सोबत भुसावळ येथील एका मंदिरात लावण्यात आले. त्यानंतर ते वरणगाव येथे पंधरा दिवस यादरम्यान ती गर्भवती असल्याचे लक्षात आले यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर ते दाम्पत्य पुण्याला कंपनीत कामानिमित्त निघून गेले. पुण्याला गेल्यानंतर सदर अल्पवयीन मुलीचे पोट व पाठ दुखत असल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी सदर मुलगी अल्पवयीन असून तिचे गर्भपात झाल्याचे डॉक्टरांना संशया आला पुण्यातील डॉक्टरांनी सदरची घटना पोलिसांना कळवली यानंतर मुलीचा जबाब घेतला असता तिने वरील हकीकत सांगितली. यामुळे पुणे येथील पोलिसांनी झिरो नंबरने सदरची घटना वरणगाव पोलिसात वर्ग केली. पीडित मुलगी पुणे येथे दवाखान्यात अॅडमीट असून वरणगाव पोलीस पुण्याला जाऊन घटनेची चौकशी केल्यानंतर सत्य बाहेर येईल या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे करीत आहेत.