जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२४
जामनेर तालुक्यातील गोद्री गावात कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात पतीने पत्न ीला केलेल्या बेदम मारहाण करीत काजल विशाल चव्हाण या विवाहितेचा खून केला. ही घटना फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोद्री गावात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध फत्तेपूर पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील ग्रोदी येथे काजल ही विवाहिता वास्तव्यास होती. त्यांचा विवाह विशाल भावलाल चव्हाण सोबत झाला होत. ती पती विशाल सासरे भावलाल लक्ष्मण चव्हाण व सासू ईमलबाई चव्हाण सह एकत्र कुंटुंबात वास्तण्यास होत. गेल्या काही दिवसांपासून मयत काजल व पती विशाल यांच्यात वाद सुरु होता दि. ४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास विशालने रागाच्या भरात काजलच्या नाका तोंडावर दांड्यांने मारहाण केल्याने यामध्ये तिचा मृत्यू झाला. विवाहितेचा मृतदेह तपासणीसाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मयत काजलचे आई वडिल दोघं अपंग असून पैशांसाठी सासरची मंडळी काजलचा छळ करीत असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली. घटना स्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांनी भेट दिली याबाबत फत्तेपूर पोलीस ठाण्यात बी.एन. एस. कलम १०३ (१) ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि गणेश फड व कर्मचारी करत आहे.