जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२३
जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील रोझलॅन्ड इंग्लिश मिडियम शाळा दि.९ ऑगस्ट २०२३ रोजी सुंदर हस्ताक्षर लेखन कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी हॅन्ड रायटिंग आणि फोनिक्स स्पेशलिस्ट जिग्ना मनीष मेहता आणि त्यांच्या सहकारी संजना धनराज भोळे यांनी इयत्ता चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराचे बारकावे समजावून सांगितले.
अभ्यासाला बसतांना बैठक व्यवस्था कशी असावी ? लेखनासाठी हाताचा वापर पेन किंवा पेन्सिलचा जोर आणि लयबद्धता याबद्दल प्रत्याशिक देण्यात आले. कमीत कमी वेळेत सुंदर हस्ताक्षरात लेखन कसे करावे याबाबतीत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट लेखन करणाऱ्या मुलांना बक्षीसे देण्यात आली .