जळगाव मिरर / १६ मार्च २०२३ ।
देशात सध्या महत्त्वाच्या दस्तावेजांपैकी एक आहे ते म्हणजे आधार कार्ड. बऱ्याच ठिकाणी आपल्याला आधार कार्डची गरज पडते. बऱ्याच कामात महत्त्वाचा दस्तावेज म्हणून आधार कार्ड मागितला जातो. त्यामुळे आधार कार्ड हे प्रत्येकाकडे आहे. आता याच आधार कार्डबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे.
आधार अथॉरिटी म्हणजेच UIDAI ने मोठी घोषणा केली आहे. बऱ्यादा आधार कार्डमध्ये काहीतरी चुका होतात किंवा त्यात काहीतरी आपल्याला बदल करायचे असतात. त्यासाठी आपण आधार कार्ड अपडेट करून घेतो. आधार कार्ड अपडेट हे आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतं. पण आधार कार्ड अपडेटसाठी शुल्क आकारलं जातं. पण आता यापुढे आधार कार्ड अपडेटसाठी शुल्क देण्याची गरज नाही. आधार अथॉरिटीने हे शुल्क माफ केलं आहे.
आतापर्यंत आधार कार्ड अपडेटसाठी 50 रुपये शुक्ल द्यावं लागत होतं. पण आधार अथॉरिटीने आता ही फी माफ केली आहे. 3 महिने आधार अपडेटसाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही. पण असं मोफत आधार कार्ड अपडेट तुम्हाला फक्त ऑनलाईनच करता येईल.
ऑफलाईन म्हणजे जर सेंटरवर जाऊन तुम्ही आधार कार्ड अपडेट करवून घेणार असाल तर मात्र तुम्हाला शुल्क द्यावं लागणार आहे. आधार कार्ड ऑनलाईन कसं अपडेट करायचं? UIDAI च्या https://ssup.uidai.gov.in/ssup/ या सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर जा. लॉगिनवर क्लिक करा. तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर आणि खाली दिलेला कॅप्चा कोड टाका.
ओटीपीवर क्लिक करा. आधारशी जोडलेल्या असलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो टाका. लॉगिन झाल्यावर सर्व्हिसेज टॅबमध्ये ‘अपडेट आधार ऑनलाइन’ सिलेक्ट करा. आता ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ वर क्लिक करा आणि जी माहिती तुम्हाला बदलायची आहे ती सिलेक्ट करा. आधार कार्डवर तुमचं नाव स्क्रिनवर दिसेल. जो दस्तावेज अपलोड करून बदलायचा आहे, तो तुम्ही बदलू शकता. चेंज केल्याचं कन्फर्मेशन द्या.