जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर २०२३
राज्याच्या राजकारणात शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार बाहेर पडल्यानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली होती त्यानंतर आता राष्ट्रवादीत देखील अशीच फुट पडली आहे. आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील ८ आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे.
शरद पवार गटाच्या आमदारांनी पक्षविरोधी कृती केल्यामुळे त्यांना अपात्र का करू नये, अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली. त्यानंतर शरद पवार गटाच्या आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. विधीमंडळाच्या नोटिशीला शरद पवार गटाकडून लवकरच उत्तर दाखल केलं जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.
विधीमंडळाने आतापर्यंत शरद पवार गटातील १० आमदारांना नोटीस धाडली आहे. विधीमंडळाने जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीच नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर विधीमंडळाने शरद पवार गटातील अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना मात्र नोटीस बजावलेली नाही. तर नवाब मलिक यांच्याकडून तटस्थ राहणं पसंत केल्याने त्यांना देखील नोटीस बजावण्यात आलेली नाही.