जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर २०२४
राज्यातील सर्वच पक्षाची उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून आता कॉंग्रेस पक्षाकडून चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 14 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले आहेत. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात पूर्वी मधुकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र आता त्यांच्या जागेवर लहू शेवाळे यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात देखील सचिन सावंत यांनी तिकीट नाकारल्यावर अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सोलापुर दक्षिण विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झालं आहे. महाविकास आघाडीतून या आधीच ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. अमर पाटील हे उद्या आपला अर्ज देखील जाहीर करणार आहेत, तत्पूर्वीच काँग्रेसने देखील आपला उमेदवार या मतदारसंघात जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कॉंग्रेसच्या चौथ्या यादीतील उमेदवारांची नावे:
1. अमळनेर – अनिल शिंदे
2. उमरेड – संजय मेशराम
3. अरमोरी – रामदास मासराम
4. चंद्रपूर – प्रवीण पडवेकर
5. वरोरा – प्रवीण काकडे
6. नांदेड उत्तर – अब्दुल सत्तार अब्दुल गफूर
7. औरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे
8. नालासोपारा – संदीप पांडे
9. अंधेरी पश्चिम – अशोक जाधव
10. शिवाजीनगर – दत्तात्रेय बहिरत
11. पुणे छावणी – रमेश बागवे
12. सोलापूर दक्षिण – दिलीप माने
13. पंढरपूर – भागीरथ भालके
14. बल्लारपूर – संतोषसिंह रावत