जळगाव मिरर / ५ एप्रिल २०२३ ।
आपण आजवर अनेक बातम्या वाचल्या असतील एक नवरा अन दोन बायको पण हि बातमी वाचून तुम्हाला धक्काच बसणार आहे. एका नवरा असलेल्याच्या तब्बल २७ बायकांसोबत लग्न करून नवऱ्याने मोठा प्रतापच केला आहे.ओडिशा राज्यातून मोठ्या कॉनमॅनला(फसवणूक करणारा) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने अटक केली आहे. रमेश स्वेन उर्फ बिभू प्रकाश स्वेन नावाच्या या व्यक्तीचे कृत्य ऐकून तुम्ही डोक्यावर हात मारुन घ्याल.
या मास्टरमाइंडला ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपीवर 10 राज्यातील 27 महिलांशी लग्न करून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या व्यक्तीचा इतिहास तपासला असता आणखी धक्कादायक खुलासे झाले आहेत. मुलांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने हैदराबादमधील लोकांकडून 2 कोटींहून अधिक रुपये उकळल्याप्रकरणी स्वेनला 2011 मध्ये अटक करण्यात आली होती. एवढेच नाही तर याआधी 2006 मध्ये त्याने 128 बनावट क्रेडिट कार्डद्वारे केरळमधील 13 बँकांची 1 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणामध्येही त्याला अटक करण्यात आली.
ओडिशा पोलिसांचे एक पथक आठ महिन्यांपासून स्वेनवर लक्ष ठेवून होते. यानंतर पोलिसांनी त्याला 13 फेब्रुवारीला पकडले. मे 2021 मध्ये दिल्लीत राहणाऱ्या स्वेनच्या पत्नीने पोलिसांत तक्रार देऊन त्यांची फसवणूक झाल्याचे सांगितले. या महिलेने 2018 मध्ये स्वेनसोबत लग्न केले होते. पोलिसांनी सांगितले की, स्वेनने भुवनेश्वरमध्ये तीन अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. तीनही अपार्टमेंटमध्ये त्याने आपल्या तीन बायका ठेवल्या.
स्वेनने ITBP असिस्टंट कमांडंट, आसाममधील डॉक्टर, छत्तीसगडमध्ये चार्टर्ड अकाउंटंट, सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाची वकील, केरळ प्रशासकीय सेवा अधिकारी अशा मोठ-मोठ्या पदांवरील महिलांची फसवणूक केली आहे. स्वेनच्या पत्नींनी सांगितले की, तो त्यांच्याकडून पैसे उधार घ्यायचा आणि नंतर नवीन महिला शोधून तिच्याशी लग्न करायचा. पोलिसांनी स्वेनची पत्नी डॉ. कमला सेठी आणि तिची सावत्र बहीण आणि ड्रायव्हर यांना फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली होती. मात्र, नंतर सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली. आता ईडी 66 वर्षीय स्वेनच्या संदर्भात ओडिशा पोलिसांच्या संपर्कात आहे आणि त्याने केलेल्या फसवणुकीची चौकशी सुरू केली आहे.
