• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

भाजपचे टेन्शन वाढणार : विधानसभेसाठी मनसेने केली इतक्या जागेची मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 13, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य
0
भाजपचे टेन्शन वाढणार :  विधानसभेसाठी मनसेने केली इतक्या जागेची मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जून २०२४

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. राज ठाकरे यांनी भाजपच्या समर्थनार्थ राज्यात सहा सभा घेतल्या होत्या. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या सहाच्या सहा जागा निवडून आल्या.
अश्यातच निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर करून एकच खळबळ माजवली. त्या धक्क्यातून भाजप सावरत नाही तोच आता मनसेनेही भाजपचे टेन्शन वाढवले आहे. मनसेने आगामी विधानसभेसाठी 20 जागांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे यातील अनेक जागांवर शिवसेनेचे ( शिंदे आणि ठाकरे गट) आमदार निवडून आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधान सभेच्या 288 जागांपैकी 20 जागांची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर विधानसभा उमेदवारांची यादीही मनसेने तयार केली आहे. मनसेने भाजपकडे वरळी, दादर-माहीम, शिवडी, मागाठाणे, जागेश्वर, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, दिंडोशी, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, पंढरपूर, औरंगाबाद आणि पुण्यातील एका जागा मागितली आहे.

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज ठाकरे यांचे पुतणे आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेचे आमदार आहेत. ही जागा मनसेने भाजपकडे मागितली आहे. येथून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर, वरळी शेजारील आणि राज ठाकरे यांचे वास्तव्य असणाऱ्या दादर – माहीम मतदारसंघाचीही मागणी मनसेने केली आहे. येथे शिंदे गटाचे सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. येथून माजी आमदार नितीन सरदेसाई यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याशिवाय शालिनी ठाकरे यांना वर्सोव्यातून तर माणसे नेते बाला नांदगावकर यांना शिवडी विधानसभेतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या. मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली. भाजपच्या जागा 23 वरून 9 वर आल्या आहेत. दुसरीकडे, इंडिया आघाडीअंतर्गत काँग्रेसला 13, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत. तर सांगलीमधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. एनडीए आघाडीच्या जागा कमी झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जून रोजी आहे. राज्यभरातील मनसे कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर येणार आहेत. तर, भाजप प्रदेशने याच दिवशी मुंबईमध्ये जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे

Related Posts

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group