जळगाव मिरर | २१ मे २०२५
जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात गेल्या काही दिवसापासून नागरीवस्तीमधील गटारी नागरिकांना काढाव्या लागत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले असून लवकरच जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून निवेदन देखील देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गेंदालाल मिल परिसरातील बिल्डींग न.४३ व ३७ येथे गेल्या अनेक दिवसापासून गटारी काढण्यासाठी मनपाचे कुठलेही कर्मचारी येत नसल्याने परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना या गटारी काढाव्या लागत आहे. जर या गटारी काढल्या नाही तर परिसरातील नागरिकांना आरोग्याचा मोठा धोका होवू शकतो. असे देखील काही नागरिकांचे म्हणणे आहे. यावर जळगाव महानगरपालिकेने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी या परिसरातून केली जात आहे. अन्यथा लवकरच परिसरातील नागरिक एकत्र येवून जळगाव मनपाच्या आयुक्त यांना निवेदन देवून आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.




















