जळगाव मिरर | १६ ऑक्टोबर २०२३
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतातील कलात्मक आधुनिक पोशाखांचे एक भव्य शोरूम असलेले ‘सुरेश कलेक्शन्स् अॅण्ड क्रिएशन’ने घटस्थापनेला ७५व्या वर्षात पदार्पण केले. अमृतमहोत्सवानिमित्त शहर व जिल्ह्यातीलच नव्हे तर भारतातील विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संचालक मुकेश ग्यानचंद हासवानी यांनी सांगितले की, गतवर्षी शारदीय नवरात्रोत्सवात आई आदिशक्तीच्या आशीर्वादाने पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजीनगर येथील ८० फुटी कानळदा रिंगरोडवर राधाकृष्ण चौकात ‘सुरेश कलेक्शन्स् अॅण्ड क्रिएशन’च्या नवीन सात मजली शोरूमचे आई पार्वतीबाई हासवानी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक श्रेणीतील ग्राहकांची पसंती जपत ती डोळ्यांसमोर ठेवत, देशातील ५० हजारांहून अधिक प्रसिद्ध ब्रँड्स या शोरूममध्ये उपलब्ध आहे. स्व. ग्यानचंद हासवानी यांनी स्थापन केलेल्या ‘सुरेश कलेक्शन्स् ॲण्ड क्रिएशन’ या दालनात सामान्य ते मध्यमवर्गीय तसेच उच्चश्रूंसाठी विविध प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील विविध अद्वितीय वस्त्रांचे सर्वात मोठे वस्त्र संकुल म्हणून सात मजली भव्य सुसज्ज इमारत, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, वातानुकूलित दालन, दालनात पर्यावरणास अनुकूल सौर ऊर्जेचा वापर, विनम्र सेवा, हजारो कपड्यांचा विविधांगी स्वरुपातील भव्य संग्रह, दालनात एक हजाराहून अधिक मॅनिक्वीन्स्द्वारे वस्त्रांचे भव्य डिस्प्ले, विशेष म्हणजे परफेक्ट चॉईससाठी सेल्फ सर्व्हिस, १५ हजारांहून अधिक साड्या, शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सात हजारांहून अधिक एथनिक वेअर्स, देशातील सर्वोत्तम ब्रेड, सुटिंग- शर्टिंगची व प्रिमिअम फॅब्रिक्सची अभूतपूर्व श्रृंखला, मोठ्या साईजपासून ते सर्व साईजपर्यंत शर्टस् व ट्राऊझर मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजेच ‘सुरेश कलेक्शन्स् अॅण्ड क्रिएशन होय. या दालनात लग्नातील कार्यक्रमाचे स्वरूप व प्रत्येक धर्मपंथानुसार, वर- वधूंपासून ते पाहुणे मंडळीपर्यंत, विविध व्हरायटीची वस्त्रश्रृंखला एकाच छताखाली उपलब्ध आहे. अमृतमहोत्सवानिमित्त सर्व ग्राहक व हितचिंतकांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असेही संचालक मुकेश ग्यानचंद हासवानी यांनी कळविले आहे.