अमळनेर : विक्की उत्तम जाधव
एरंडोल तालुक्यातील मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने सेवा गौरव सम्मान 2023 पुरस्काराने अमळनेरचे समाजभुषण दिपक उखर्डु वाल्हे यांना सन्मानित नुकतेच करण्यात आले.
अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र परीट धोबी युवा संघटनेचे उपाध्यक्ष समाजभुषण श्री दिपक उखर्ड वाल्हे हे गेल्या 17- 18 वर्षापासून करीत असलेल्या सामाजिक कार्याची व योगदानाची दखल घेऊन त्यांना मानव सेवा बहुउद्देशीय संस्था एरंडोल जि .जळगाव ह्या संस्थेच्या वतीने सेवा गौरव सम्मान 2023 पुरस्कार . हा राज्यस्तरीय पुरस्कार एरंडोल नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री विजय आण्णा महाजन काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मोहनजी शुक्ला ज्येष्ठविधीज्ञ एरंडोल तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विनयजी गोसावी प्रांताधिकारी सौ सुचिता चव्हाण तहसीलदार श्री सतीश गोराडे पोलीस निरीक्षक त्यांच्या सोबत श्री गणेश नेरकर अध्यक्ष लॉन्ड्री धारक संघटना अमळनेर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री विकीभाऊ खोकरे यांनी केले तर सूत्रसंचालन सौ वैशाली पाटील जळगाव यांनी केले