जळगाव मिरर / २५ मार्च २०२३ ।
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत एन. एस. यु. आय.विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. निरज कुंदन, राष्ट्रीय सरचिटणिस व महाराष्ट्राचे प्रभारी श्री. नागेश करियप्पा व एन.एस.यु.आय. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमिर शैख यांनी नुकतीच कार्यकारणी जाहीर केली.
त्यात रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरिष चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी यांची प्रदेश सरचिटणीस पदी निवड केली जळगाव जिल्ह्यातील युवकांना मध्ये धनंजय चौधरी यांचा दांडगा जनसंपर्क आहे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते अग्रेसर असतात. त्यांची निवड झाल्याने विद्यार्थी व जळगाव जिल्हा एन.एस.यु.आय ला नव्या तकातिन काम करता येईल.
