जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२४
न्यू जागृती मित्र मंडळ संचलित जिजामाता माध्यमिक विद्यालयात रोटरी क्लब ऑफ गोल्ड सिटी जळगाव कडून शालेय होतकरू विद्यार्थ्यांना बूट,सॉक्स व हात रुमाल वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रो.जितेंद्रजी ढाके व सोबत किशोर सूर्यवंशी सर तसेच प्रमुख पाहुणे संस्थाध्यक्ष बापूसाहेब डी.एल.महाले, रोटरी अध्यक्ष रो.तुषार जाखेटे,रो.सचिव -विनय बंसल, रो.प्रवेश मुंदडा,रो. निलेश जैन, रो.जितूभाई रावलानी, मुख्याध्यापक राजेंद्र आर.खोरखेडे उपस्थित होते. यानंतर रो.निलेशजी जैन यांच्या वाढदिवस शुभेच्छा मंत्र व श्रीफळ देऊन साजरा करण्यात आला. नंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते 550 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बूट वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा पाटील तर आभार प्रदर्शन किशोर पाटील यांनी केले.