जळगाव मिरर / २८ मार्च २०२३ ।
राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व पक्षीय आमदार आपापल्या मतदार संघात पोहचले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी करून त्यांना त्यांनी सोडण्यात आले आहे.
छगन भुजबळ हे येवल्याहून नाशिकला परत येत असताना त्यांची प्रकृती बिघडली. थंडी ताप वाढल्याने त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी करून त्यांना त्यांनी सोडण्यात आले आहे. छगन भुजबळ हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्याला गेले होते. येवल्यावरून परत येत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. ताप आणि थंडी वाढल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने वाटेत अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली. त्यानंतर त्यांना घरी जाण्यास मुभा दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. सध्या भुजबळ हे नाशिक मधल्या घरी पोहोचले आहेत.