जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२४
गेल्या काही दिवसापासून देशाच्या क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती अजूनही पूर्णपणे बरी झाली नाही. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. त्यांच्या स्मृती भ्रम अजूनही बरा झालेला नाही. कांबळी यांच्यावर उपचार करणारे डॉ. विवेक द्विवेदी यांनी त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतु त्यांचा समोर आलेला व्हिडिओ अजूनही प्रकृती अस्थिर असल्याचे दर्शवत आहे. त्यांना मदतीशिवाय चालताही येत नसल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे.
विनोद कांबळी यांचा आजाराचे मुख्य कारण दारुची सवय आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी दारु सोडली आहे. डॉक्टर म्हणतात, विनोद कांबळी यांना दोन वेळा फिजियोथेरेपी, न्यूट्रिशनल सपोर्ट आणि स्पीच थेरेपीची गरज आहे. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होईल. कांबळी यांना पूर्ण बरे होण्यासाठी सातत्याने उपचार गरजेचे आहे.
विनोद कांबळी यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाकडून पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच कांबळी यांच्या पाठिशी पूर्णपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. ठाणे येथील आकृती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार होत आहे. रुग्णालयाने त्यांच्याकडून कोणतेही बिल न घेण्याचाही निर्णय घेतला आहे.