जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२४
जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या गावात गावठी कट्टा बाळगल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच भुसावळ तालूक्यातील वरणगाव येथील एका तरुणाला गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी दि.14 अटक केली. यावेळी त्याच्याकडून गावठी कट्टा आणि दोन जिवंत राऊंड पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरीष राहुल उजलेकर (रा. वरणगांव, ता.भुसावळ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथे राहणारा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा गावठी पिस्तूल घेऊन भुसावळ शहरात काहीतरी गुन्हा करण्यासाठी येत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला गावठी पिस्तूल दोन जिवंत राऊंडसह अटक केली याप्रकरणी बाजारपेठ निषेध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त माहिती मिळाली होती, की उजलेकर हा हा गावठी पिस्तूल घेवुन कोणतातरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याचे उद्देशाने भुसावळ शहरातील वरणगांव रोडवरील एम. आय.डि.सी. परिसरातील शॉपिंग काम्पलेक्स जवळ येणार आहे. त्यावरुन पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकून त्याला पकडले. यावेळी त्याच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीची गावठी पिस्टल मॅगझीनसह त्यामध्ये दोन राउंड दोन हजार रुपये किमतीचे असे 17000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेडी अप्पर पोलीस अधिक्षक अशोख नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्ना खाली केली आहे.