धरणगाव : विनोद रोकडे
तालुक्यातील भवरखेडे येथील श्री जय बजरंग व्यायाम शाळा भवरखेडे येथे संक्रांतीच्या निमित्ताने भव्य अशी कुस्त्या ची दंगल दरवर्षी भरवण्यात येते या वर्षी ही दिनांक १५ जानेवारी २०२३रविवार रोजी दुपारी तीन वाजता आयोजित केली आहे.
यावेळी आखाड्याचे पूजन जळगांव जिल्हा चे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील नामांकित मल्ल येणार असून मोठ्या प्रमाणात बक्षीस वितरण करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि प सदस्य प्रतापराव पाटील पोलीस निरीक्षक राहुल खाताळ धानोरा चे सरपंच व कॉन्ट्रॅक्टर भगवान महाजन , उलजिल्हा प्रमुख पी एम पाटील, परीट समाजाचे अध्यक्ष छोटू जाधव, माजी नगरसेवक भानुदास विसावे, शिवसेना उपशहर प्रमुख रवी जाधव, अधिकृत पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष विनोद सुरेश रोकडे व्यायाम शाळा चे अध्यक्ष राम भाऊ सूर्यवंशी सचिव मनोज अर्जुन पाटील यांच्या हस्ते मल्ल ना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात येणार आहे तरी सदर कर्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निबा माळी, कैलास माळी , मनोहर सोनवणे यांनी केले आहे