जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२४
जळगाव शहरातील काही परिसरात नागरिकांना बसण्यासाठी बाकडे नसल्याच्या तक्रारी शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार आज दि.२२ फेब्रुवारी पासून डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी स्वखर्चातून बाकडे वाटपाची मोहिम हाती घेतली आहे.
जळगाव शहरातील काही परिसरातील मंदिर व चौकासह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था नसल्याच्या तक्रारी मनपाचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्याकडे गेल्या अनेक दिवसापासून येत होत्या, याची दखल घेत त्यांनी दि. २२ फेब्रुवारी पासून शहरातील गणेश कॉलनी सह पिंप्राळा परिसरातील काही भागात बाकडे देण्याची मोहीम हाती घेतली असून आगामी दोन महिन्यात संपूर्ण शहरातील परिसरात माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून बाकडे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.अश्विन सोनवणे यांनी दिली आहे. तर ज्याठिकाणी हे बाकडे मिळाले त्या परिसरातील नागरिकाकडून डॉ.अश्विन सोनवणे यांचे कौतुक होत आहे.