जळगाव मिरर | २३ नोव्हेबर २०२४
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकाल येत्या काही तासात येणार असून आता मात्र काही उमेदवार आघाडीवर दिसत आहे.
अमळनेर मतदार संघात महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील हे 4900 मतांनी पहिल्या फेरीत आघाडीवर आहे मात्र येत्या काही तासात अमळनेर मतदार संघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.