जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२३
पाचोरा तालुक्यातील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी पिंपळगाव(हरे.) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.१७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमांनी तिला काही तरी फूस लावून घराच्या ओट्यावरून पळवून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पिंपळगाव पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ.रामकृष्ण पाटील हे करीत आहेत.