जळगाव मिरर / १९ एप्रिल २०२३ ।
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांचा वसंतरावजी नाईक चौक येथे पुर्णकृती पुतळा बसवून त्या चौकाचे सुशोभिकरण करण्यात यावे, या मागणीसाठी आज दि. १९ रोजी महापौर जयश्रीताई महाजन यांना बंजारा समाजाच्या सर्व सामाजिक संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी.बी.धाडी, अध्यक्ष-रामराज्य गृप नितीन जाधव, चेतन चव्हाण (सचिव-गोरसेना, जळगाव), विशाल पवार (जिल्हाध्यक्ष-VJNT सेल, जळगाव), करतार चव्हाण (जि.का.सदस्य-वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना), राजेश नाईक (जि.का.सदस्य-वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, जळगाव), सुरेश राठोड (सचिव-बंजारा ब्रिगेड), सुनील चव्हाण (शहर प्रमुख-गोरसेना ,जळगाव), दयाराम तंवर(सामाजिक कार्यकर्ता) यांच्यासह इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी महापौर जयश्रीताई महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.