जळगाव मिरर | ९ नोव्हेबर २०२३ | राज्यभरात अनेक जिल्ह्यातील शिक्षण विभागात सुरु असलेल्या चुकीच्या कृत्य उघड होत असतांना आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. एका शाळेच्या २१ वर्षीय शिपायाने शाळेतील विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांना त्रास दिल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार उघड झाल्याने विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणात आरोपीला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबरपासून आरोपीने विद्यार्थिनींना फोन करण्यास सुरूवात केली होती. आरोपी शालेय विद्यार्थिनींना फोन करून त्यांच्याशी आक्षेपार्ह भाषेत बोलायचा. तसेच शाळेच्या परिसरात देखील आरोपी त्यांच्याबद्दल अश्लिल शेरेबाजी करत होता. त्याचा मुलींना प्रचंड त्रास व्हायचा. अखेर तिघींनी घडलेल्या प्रकाराची तक्रार पालकांकडे केली. ‘आरोपीने पहिल्यांदा २ नोव्हेंबर रोजी शाळेत असताना मुलींवर अश्लील शेरेबाजी केली होती. या प्रकाराने मुली घाबरल्या. मात्र, नंतर त्यांनी याबाबत पालकांना माहिती देण्याचा निर्णय घेतला. पालकांनी तक्रार केली,’ अशी माहिती वांद्रे पोलिसांनी दिली. घडलेल्या प्रकाराने अल्पवयीन मुलींना मोठा मानसिक धक्का बसला आहे.