जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२३
जगभरातील अनेक लोक डिजिटल माध्यमातील बँकिग सेवेचा लाभ घेत असतात. आपण अनेक घटना वाचलेल्या किवा घडलेल्या असतात कि काही हि कारण नसताना आपल्या खात्यात चुकून पैसे आलेले असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यात घडली आहे. एक मजूर रातोरात अरबपती झाला आहे. त्याच्या खात्यात २ अरब २१ कोटी रुपये जमा झाले आहेत. एवढी रक्कम बघून मजुराला धक्काच बसला. मात्र आता ही रक्कम त्याच्यासाठी अडचणीची ठरत आहे. कारण खात्यात रक्कम येताच आयकर विभागाने नोटीस पाठविली आहे.
हा सर्व प्रकार बस्तीतील लालगंज पोलीस स्थानकाच्या हद्दीतील बरतनिया गावातील आहे. येथील शिवप्रसाद विशादच्या घरी आयकर विभागाची नोटीस आली आणि गोंधळाला सुरुवात झाली. शिवप्रसाद दिल्लीत दगड फोडण्याचं काम करतो. मजुरी करून पोट भरत असतानाही आयकर विभागाची नोटीस आल्यामुळे त्याचं संपूर्ण कुटुंब काळजित पडलं. कारण शिवप्रसादच्या बैंक खात्यात २२१ कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. इतकंच नाही तर त्याला सर्व कागदपत्रं घेऊन आयकर विभागाच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
शिवप्रसादला प्रश्न पडलाय की, त्याच्या खात्यात इतके पैसे आले कुठून. आता तो दिल्लीतील काम सोडून गावी आला आहे. शिवप्रसाचं पॅनकार्ड २०१९ मध्ये हरवलं होतं, त्याच्या मदतीने कोणीतरी शिवप्रसादच्या नावाने नकली अकाऊंट काढून हा कारनामा केला आहे. दरम्यान, यासंदर्भात त्याने लालगंज पोलीस स्थानकात माहिती दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बँक खात्याच्या सर्व माहितीसह तक्रार केली आहे. तसेच शिवप्रसादने आयकर विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्नही केला आहे.