जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२४
शहरासह परिसरातून अनेक ठिकाणाहून चोरीच्या घटना घडत असतांना नुकतेच एक व्यापारी भुसावळ येथे व्यापार करण्यासाठी जात असताना जळगाव शहरातील दादावाडी परिसरातून अज्ञात तीन जणांनी गाडीमधील एक लाख वीस हजाराची बॅग घेऊन पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून दोन तासांमध्ये तीघांच्या मुसक्या आवळल्या व मुद्देमाल ताब्यात घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथील व्यापारी हिराभाई किरीट भाई रावल हे भुसावळ या ठिकाणी हुंडाई गाडी क्रमांक जीजे 01 आर एल 8188 ने जात होते. जळगाव येथील दादावाडी येथील पेट्रोल पंप जवळ आसलेल्या आयडीबीआय बँकच्या एटीएम समोर थांबलेले होते. तेवढ्यात तीन जण मोटरसायकलवर आले त्यातील एकाला चक्कर आल्याचे नाटक त्यांनी केले. त्यावेळेस दुसऱ्याने गाडीमध्ये असलेली बॅग ज्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये होते ती घेऊन भुसावळच्या दिशेने पसार झाला.
दरम्यान त्यांचे लोकेशन शोधून वाहन चालक महेश सूर्यवंशी यांनी अति वेगाने वाहन चालून त्यांना भुसावळ येथे शेतात पळून जात असताना पाठलाग केला. एलसीबीच्या टीमपीएसआय दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, सहाय्यक खासदार अतुल वंजारी, पोहे हिरालाल पाटील, राजेश मेढे, चिन्मय पाटील यांनी संशयित आरोपी जितेंद्र रामलाल चव्हाण वय 32 राहणार टाहकळी ता. मुक्ताईनगर, राजेंद्र मधुकर जाधव वय 31, बंडू जेता राठोड वय 28 मुराझिरा मुक्ताईनगर या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन मोटरसायकल व एक लाख वीस हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.