जळगाव मिरर / १५ एप्रिल २०२३ ।
सन २०१९ मध्ये जगभर कोरोनाचा आजार मोठ्या प्रमाणात पसरलेला असतांना त्यानंतर परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर अनेकांनी आपल्या आरोग्याचा विमा काढला होता त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील विम्याला सध्या खूप महत्व दिले आहे. त्यासोबतच आपण नेहमी जीवन विमा, वाहन विमा आणि गृह विमा, या सर्व विमा पॉलिसी तुम्ही आजपर्यंत ऐकल्या असतील आणि त्या घेतल्या देखील असतील. पण तुमचा ‘लव्ह इन्शुरन्स’ आहे का किंवा तुम्ही त्याबद्दल ऐकले आहे का?
जर नसेल तर आज या आम्ही तुम्हाला या नवीन प्रकारच्या विम्याबद्दल सांगणार आहोत. अनेक कंपन्या त्यांच्या ग्राहकांना हा विमा देतात. यामुळे तुम्हाला हृदयविकार किंवा प्रेमात फसवणूक झाल्यास विमा संरक्षण मिळते. काळ बदलतोय. अलीकडेच एका मुलाची प्रेमात फसवणूक झाली. त्यानंतर त्याला हार्ट ब्रेक फंडांतर्गत 25 हजार रुपये मिळाले. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि तुम्ही हार्ट ब्रेक इन्शुरन्स कसा घेऊ शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.
I got Rs 25000 because my girlfriend cheated on me .When Our relationship started we deposited a monthly Rs 500 each into a joint account during relationship and made a policy that whoever gets cheated on ,will walk away with all money.
That is Heartbreak Insurance Fund ( HIF ).— Prateekaaryan (@Prateek_Aaryan) March 15, 2023
प्रेयसीकडून फसवणूक मिळाले, 25 हजार रुपये
काळ बदलतोय. आता लोकांचा प्रेमावरही विश्वास नाही, म्हणूनच लोक ‘प्रेमाचा विमा’ करत आहेत. होय, एका मुला-मुलीने सोशल मीडियावर रिलेशनशिप दरम्यान दर महिन्याला काही पैसे गुंतवले. आता यानंतर ज्याची फसवणूक होईल त्याला हे सर्व पैसे मिळतील. तरुणाची प्रेयसीने फसवणूक केल्यावर गुंतवलेले सर्व पैसे मुलाने मिळवले.
वास्तविक, दोघांनी एका अटीवर हार्टब्रेक फंड तयार केला. ज्यामध्ये दोघेही दरमहा 500 रुपये गुंतवत होते. आता काही दिवसांनी मुलीने मुलाची फसवणूक केली, त्यानंतर मुलाने निधीचे सर्व पैसे म्हणजे 25 हजार रुपये मिळवले. ज्याची माहिती त्याने ट्विटरवर दिली आहे.
या कंपन्या करतात हार्टब्रेक इन्शुरन्स
सेफरन आणि Poineer विमा कंपन्या तुमच्या नातेसंबंधाचा विमा काढतात. म्हणजे त्यात तुम्ही तुमच्या प्रेमाचा विमा काढू शकता. प्रेमात फसवणूक झाल्यास या अंतर्गत विमा संरक्षण मिळू शकते. सेफरन तुमच्या प्रेमाचा MONA म्हणजेच Move On NA नावाने विमा उतरवतो. कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.