• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

PM नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन ; अंत्ययात्रेला सुरुवात !

घरखर्च भागवण्यासाठी करायच्या सूत कातण्याचे काम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 30, 2022
in देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
PM मोदींच्या मातोश्रींची प्रकृती बिघडली ; मोदी अहमदाबादला येण्याची शक्यता !
Share on FacebookShare on Twitter

हीराबेन यांची तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. हीराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांचे प्रधान सचिव के. कैलासनाथन रुग्णालयात गेले होते. त्यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना भेटून हीराबेन यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. तसेच त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही अहमदाबादला आले होते. त्यांनी आपल्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच आईसोबत थोडावेळ घालवला होता.हीराबेन यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे हीराबेन यांची प्रकृती अधिकच खालावली. उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याच वर्षी 18 जून रोजी हीराबेन यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
आईच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: गांधीनगर येथे येणार असल्याचं वृत्त आहे. मोदी अंत्यसंस्काराला येणार असल्याने गांधी नगरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे.

शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi

— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022

हीराबेन यांचा जन्म 18 जून 1923मध्ये झाला होता. या वर्षी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. आईच्या वाढदिवसासाठी स्वत: नरेंद्र मोदी गुजरातच्या गांधीनगरला आले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सात भाऊ बहीण आहेत. सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, बहीण वासंतीबेन, पंकजभाई मोदी आदी त्यांच्या भाऊ आणि बहिणींची नावे आहेत. त्यात मोदी तिसऱ्या क्रमांकाचे आहेत.मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी अहमदाबादमध्ये किराणा दुकान चालवतात. मोदींचे मोठे बंधू सोमभाई आरोग्य विभागात कामाला होते, आता ते निवृत्त झाले आहेत. ते आता अहमदाबादेत एक वृद्धाश्रम चालवतात. तसेच सामाजिक कार्यात व्यस्त असतात. अमरुतभाई यांनी एका खासगी कंपनीत फिटर म्हणून काम केलं आहे. आता तेही निवृत्त झालेले आहेत. मोदी यांचे सर्वात लहान बंधू पंकज मोदी हे गुजरातच्या माहिती विभागात कामाला होते. तेही निवृत्त झाले आहेत. हीराबेन पंकजभाईंसोबतच गांधीनगरला राहत होत्या.

Related Posts

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group