
जळगाव मिरर | १८ मार्च २०२४
जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरातील खडके चाळ येथील हिमांशु महिला बहुउद्देशिय संस्थेतर्फे येथील महिलांना ‘मासिक पाळी’ या विषयावर उद्बोधन कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी खडके चाळ परिसरातील सर्व महिला उपास्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन नियोजन संस्थेच्या सर्व पदाधिकारी भाग्यश्री बाविस्कर, शोभा झुंझारराव, रंजना कोळी, प्रीती मांडोळे, वर्षा पाटील, संगीता जराड, वैशाली बाविस्कर यांनी केले व सर्व महिलांना मार्गदर्शन राज्यस्तरीय प्रशिक्षण तज्ञ ललिता पाटील यांनी केले व महिलाना त्यांच्या सोप्या भाषेत समजविले तसेच महिलानी या विषयावर मुक्तपने बोलले पाहिजे, स्वतः ची काळजी घेतली पाहिजे.
अधिक त्रास होत असल्यास डॉ. चा सल्ला घेतला पाहीजे असे सांगितले. संस्थेच्या अध्यक्ष श्रीम. वैशाली बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले तर संस्थेच्या सचिव- सौ भाग्यश्री बाविस्कर यांनी आभार मानले व मासिक पाळी उदबोधन कार्यशाळे ची सांगता केली.



















