जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२४
आजीकडे जावून येते असे सांगून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. ही घटना दि. १९ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका परिसरात चौदा वर्षीय मुलगी कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. १९ रोजी दुपारी ती तिच्या आईला आजीकडे जावून लगेच येते असे सांगून घरातून निघाली. मात्र बराच वेळ झाला तरी देखील ती घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेवून देखील मुलगी मिळून न आल्याने अखेर त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहे.