जळगाव मिरर / २६ मार्च २०२३ ।
जिल्ह्यात एकापाठोपाठ एक खून होत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. यावल तालुक्यातील वृद्धाचा तर चोपडा तालुक्यात लहान भावाने मोठ्या भावाचा तर आज दि २६ रोजी जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, पाचोरा, जामनेर, यावल तालुक्यात झालेले खुनाचे गूढ बाहेर येत नाही तोच आज दि २६ रविवारी रोजी रात्री पुन्हा तरुणाचा खून झाला आहे. गेल्या तिन्ही खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गोलाणी मार्केटमध्ये तळ मजल्यावर काही तरुणांमध्ये रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास वाद सुरू होता. रात्री १०.१५ च्या सुमारास एका ३५ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, अमोल ठाकूर, उमेश भांडारकर, तेजस मराठे, योगेश इंधाटे, रतन गीते यांच्यासह पोलिसाचा ताफा घटनांस्थळी दाखल झालाा आहे. दरम्यान खाजगी वाहनातून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला आहे.
