जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२३
राज्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक उद्योजकांसह तरुणांना आर्थिक फटका बसल्याचा घटना सातत्याने घडत आहे. अशीच एक संतापजनक घटना बुलढाण्यात घडली आहे. एका डॉक्टराला मारहाण करीत त्याच्याकडून तब्बल २० लाखांची खंडणी मागण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करीत ५ संशयित आरोपीना बेड्या देखील ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कॅन्सरच्या पेशंटला तपासायचे आहे असे सांगून बुलढाणा शहरातील एका सुप्रसिद्ध डॉक्टरला अज्ञात ठिकाणी नेट त्यानंतर डॉक्टरला मारहाण करीत त्यांच्या जवळील १० हजार रुपये देखील लुटण्यात आले हे आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी डॉक्टरांच्या मुलांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली. यासह डॉक्टरचे कपडे काढून अश्लील व्हिडीओ बनवण्यात आला. पुढे आरोपींनी हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि खंडणी म्हणून 20 लाख रुपये मागितले.
अॅडवांस म्हणून तब्बल साडेआठ लाख रुपये या डॉक्टरांकडून वसूल देखील करण्यात आले आहेत. घाबरलेल्या डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आठ जणांविरोधात बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आठ जणांपैकी पाच जणांना बुलढाणा पोलिसांनी अटक केलीये. तर इतर आरोपींच्या शोधात पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडालीये.