जळगाव मिरर । २ फेब्रुवारी २०२३।
जगातील बाजारात कच्चा तेलाच्या किंमती आटोक्यात असल्या तर भारतीय विकासाचा रथ कोणीही रोखू शकणार नाही, असा दावा आर्थिक सर्वेक्षणात करण्यात आला आहे. कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार होतो. पण गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण सुरु आहे. ही घसरण कायम राहिल्यास भारतीय तेल विपणन कंपन्यांचा तोटा भरुन निघेल. सध्या कंपन्यांना पेट्रोलवर 5 रुपये तर डिझेलवर 13 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. तोटा भरुन निघाल्यास पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची शक्यता आहे. भारतीय तेल विपणन कंपन्या सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय किंमतींच्या आधारे निश्चित करतात. राज्यानुसार, शहरानुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत तफावत दिसून येते.
आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये गेल्या 24 तासात घसरण दिसून आली. या किंमती घसरुन 83.34 डॉलर प्रति बॅरल झाल्या. डब्ल्युटीआईच्या दरात घसरण झाली. हा भाव 77.01 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. प्रत्येक दिवशी सकाळी या किंमती अपडेट होतात.
आज दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेलचा भाव 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.
अहमदनगर पेट्रोल 106.62 तर डिझेल 93.13 रुपये प्रति लिटर, अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर, अमरावतीत 107.23 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर, औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर, नागपूरमध्ये पेट्रोल 106.18 तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर, नांदेडमध्ये पेट्रोल 108.48 तर डिझेल 94.60 रुपये प्रति लिटर आहे.
जळगावमध्ये पेट्रोल 106.15 आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 106.18 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर, लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर, कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.25 आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर, पुण्यात पेट्रोलचा भाव 105.84 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर, सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.49 रुपये तर डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर आहे.
तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.