जळगाव मिरर | २२ मे २०२५
दुकानाचे शटर वाकवून ४१ जून्या बॅटरी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. या चोरट्यांचा एमआयडीसी पोलिसांनी २४ तासात जेरबंद केले असून त्यांना अकोल जिल्ह्यातील तेल्हारा येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुप्रिम कॉलनीतील रहिवासी अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी यांचे अजिंठा चौफुलीजवळ बॅटरीचे दुकान आहे. दि. १७ मे रोजी रात्री ८ ते १८ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान, अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी यांच्या दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी ४१ हजार रुपये किंमतीच्या ४१ जुन्या बॅटऱ्या चोरुन नेल्या होत्या. याप्रकरणी दि. १९ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी बॅटऱ्या चोरुन नेणाऱ्या दोघांच्या अकोल्यातून आवळल्या मुसक्या अधिकारी संदीप पाटील यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली.
गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, दत्तात्रय बडगुजर, पोना प्रदीप चौधरी, सिद्धेश्वर डापकर, रतन गिते, योगेश बारी यांच्या पथकाने घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली.
चोरट्यांनी पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिक अप वाहन वापरल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तेल्हारा, अकोला येथे जाऊन अजमदउल्ला अमानतउल्ला खान (वय २४) आणि सैय्यद दानिश सैय्यद ईसमाईल (वय २५) या दोघ संशयितांच्या मुसक्या आवळल्या.





















