जळगाव मिरर | २१ जुलै २०२३
जळगाव शहरानजीक असलेल्या गिरणा नदीपात्रातून नियमितपणे चोरटी वाळूची वाहतूक सुरु असल्याच्या घटना तालुका पोलिसांच्या कानावर आले असतांना त्यांनी वाहतूक सुरु असतांना एका ट्रॅक्टर पकडून चालकाविरोधात तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातून नजीक असलेल्या गिरणा नदी पात्रातून दिनांक २० जुलै रोजीच्या सुमारास गिरणा नदी पात्रातून एक ब्रास अवैध वाळूची वाहतूक करीत असताना एक ट्रॅक्टर निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालय समोरून जात असताना पोलीस पथकाने कारवाई करीत सुमारे ३ हजार रुपये किमतीची अवैध वाळू तर २ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी जनार्दन शांताराम सूर्यवंशी रा.भिकमचंद नगर, पिंप्राळा रोड जळगाव यांच्या विरोधात तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भालेराव हे करीत आहे.