जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
पाचोरा शहरात घरगुती वापरासाठीचे गॅस वाहनात इंधन म्हणून भरत असताना पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत २१ सिलिंडर, दोन पंप वाहने आणि साहित्य जप्त करण्यात आले. त्यात पाचोरा पोलिसांनी तीन जणांविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा केली.
सविस्तर वृत्त असे कि, जारगाव चौफुलीवर एका दुकानात घरगुती गॅसचा वाहनामध्ये इंधन म्हणून वापर करण्यासाठी अवैधरीत्या पंप सुरू असल्याची माहिती पाचोरा पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी स्वतः पोलिस पथकासह दुकानात धाड टाकून ५ गॅस सिलिंडरसह ज्योती कंपनीचे मशीन तसेच एक हॉर्सपॉवरची इलेक्ट्रिक मोटार गॅस भरण्याची स्प्रेयर मशीन तसेच इतर साहित्य असा एकूण तीन लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.
या गोरख धंद्याच्या मुख्य सूत्रधाराला मात्र अटक करण्यात आली नाही. पुरवठा निरीक्षक अभिजित येवले यांनी गॅस सिलिंडरचा पंचनामा केला. तसेच त्या दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल झाला पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके करीत आहेत.